महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डने कल्याणचा कवी नवनाथ रणखांबे सन्मानित...
उल्लेखनीय कार्यामुळे जीवन संघर्ष पुस्तकाची 'महाराष्ट्र बुक रेकॉर्ड' 2020 मध्ये ऐतिहासिक 'राष्ट्रीय विक्रमाची' नोंद झाली असून महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डच्या वतीने नवनाथ रणखांबे सन्मानित केले आहे.

महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डने कल्याणचा कवी नवनाथ रणखांबे सन्मानित...
कल्याण : उल्लेखनीय कार्यामुळे जीवन संघर्ष पुस्तकाची 'महाराष्ट्र बुक रेकॉर्ड' 2020 मध्ये ऐतिहासिक 'राष्ट्रीय विक्रमाची' नोंद झाली असून महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डच्या वतीने नवनाथ रणखांबे सन्मानित केले आहे.
नवनाथ रणखांबे यांचे पहिलेच पुस्तक शारदा प्रकाशन ठाणे यांनी प्रकाशित केलेल्या जीवन संघर्ष या पुस्तकावर कमीत कमी वेळेत विविध मान्यवरांनी लिहिलेली ८१ परीक्षणे दर्जेदार वर्तमानपत्र, दैनिक, साप्ताहिक, मासिक, इ. मध्ये प्रसिद्ध झाली आहेत. मराठी साहित्य क्षेत्रात असे भरघोस यश मिळालेले कवी नवनाथ रणखांबे यांचे पहिलेच पुस्तक असून जीवन संघर्ष हे गाजले आहे.
विविध पुरस्काराने सन्मानित झालेल्या जीवन संघर्ष पुस्तकाला मागच्या वर्षी आंतरराष्ट्रीय मानव अधिकार नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय साहित्य पुरस्काराने सन्मानित केले. तसेच इंडिया टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड, रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्डमध्ये यापूर्वी ऐतिहासिक विक्रम होऊन नोंद झाली आहे. नवनाथ रणखांबे हे डायमंड बुक ऑफ रेकॉर्ड धारक ही आहेत.
कल्याण, ठाणे
प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे
___________