गारगांव परिसरातील रस्ते भ्रष्टाचार प्रकरणी विधानसभा उपाध्यक्षांचे जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश

वाडा तालुक्यातील गारगांव-परळी विभागातील 133 गाव पाडयांमधील रस्त्यांची कामे न करताच बोगस बिले काढण्याचा प्रकार घडला आहे. सुमारे 17 कोटी पेक्षा जास्त निधीचा अपहार झाल्याची तक्रार शिवक्रांती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शरद पाटील यांनी पुराव्यांसह केली होती.

गारगांव परिसरातील रस्ते भ्रष्टाचार प्रकरणी विधानसभा  उपाध्यक्षांचे जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश
road corruption case

वाडा सत्यवान तरे :

वाडा तालुक्यातील गारगांव-परळी विभागातील 133 गाव पाडयांमधील रस्त्यांची कामे न करताच बोगस बिले काढण्याचा प्रकार घडला आहे. सुमारे 17 कोटी पेक्षा जास्त निधीचा अपहार झाल्याची तक्रार शिवक्रांती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शरद पाटील यांनी पुराव्यांसह केली होती. हे प्रकरण उघडकीस येताच सार्वजनिक बांधकाम खात्याने चौकशी करून गुन्हे दाखल करण्याऐवजी या रस्त्यांची कामे करून घ्यायला सुरुवात केली आहे. विर्हे व उंबरपाडा रस्त्यांची कामे ठेकेदाराने सुरू केली आहेत.(road corruption case0

याबद्दलची तक्रार घेऊन शरद पाटील हे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे गेले असता त्यांनी सर्व पुराव्यांची व कागदपत्रांची खातरजमा करून या प्रकरणाची तत्काळ चौकशी करून अहवाल सादर करावा, असे आदेश पालघर  जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.याच बोगस बिलांची व झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे आदेश पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादासाहेब भुसे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिले होते. मात्र चौकशी न करता रस्त्यांची कामे सुरू केल्याने ठेकेदारांना व कर्मचाऱ्यांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप शरद पाटील यांनी आपल्या निवेदनाद्वारे केला आहे.

जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये ठेकेदार कमी दराने काम घेतात व बिल मात्र पूर्ण रकमेचे काढतात असेही प्रकार उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे. तरीही वरिष्ठ अधिकारी कुठल्याही प्रकारची कारवाई करत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येते. गेल्या तीन वर्षांमध्ये जव्हार सा.बां.विभागांमध्ये मोठ्याप्रमाणावर कामे न करताच बोगस बिले काढली आहेत. या सर्व प्रकाराची विशेष तपास पथक मार्फत (SIT) चौकशी करावी, अशी मागणी शरद पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.(road corruption case0