चंदन तस्करी प्रकरणी आरोपींना जामीन मंजूर - अॅड. तेजस नेहरकर

सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना बीडचे पोलीस अधिक्षक यांचे गुप्त बातमी दाराकडून बातमी मिळाली की, मौजे पिंपरी तालुका गेवराई येथील श्रीमंत बांगर यांने त्यांच्या मोरवंडी शेतामधील पत्र्याच्या शेडमध्ये लाकूड तासून चंदनाचा सुगंधी गाभा काढून त्याची तस्करी करण्यासाठी त्याच्या शेतात पोते भरून ठेवले आहेत.

चंदन तस्करी प्रकरणी आरोपींना जामीन मंजूर - अॅड. तेजस नेहरकर
sandalwood smuggling case

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

बीड  दिनांक 20/01/2022 रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना बीडचे पोलीस अधिक्षक यांचे गुप्त बातमी दाराकडून बातमी मिळाली की, मौजे पिंपरी तालुका गेवराई येथील श्रीमंत बांगर यांने त्यांच्या मोरवंडी शेतामधील पत्र्याच्या शेडमध्ये  लाकूड तासून चंदनाचा सुगंधी गाभा काढून त्याची तस्करी करण्यासाठी त्याच्या शेतात पोते भरून ठेवले आहेत. अशी माहिती मिळाल्यामुळे पोलीसांचा ताफा व पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी धाड टाकली. त्यामध्ये रूपये 7,78,200 चंदनाचा सुगंधी गाभा, जीप, मोटरसायकल जप्त केले व 17 आरोपींना मुद्देमालासह अटक केली होती.(sandalwood smuggling case)

या आरोपीचा जामीन  मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी गेवराई यांनी जामीन नामंजूर केला होता. जिल्हा व सत्र न्यायालय बीड येथे 7 आरोपींचा  जामीन क्रिमिनल फौजदारी अर्ज क्रमाक 83/2022 नुसार दाखल केला होता. सदरील प्रकरणात अँड. तेजस सुभाष नेहरकर यांचा अभ्यासपूर्ण उत्कृष्ट युक्तिवाद ऐकून आणि आरोपीच्या सुटकेसाठी सबळ पुरावे  मा. न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यामुळे मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी आरोपींचा जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात आरोपीच्या वतीने अँड. तेजस नेहरकर यांनी काम पाहिले. व आरोपींना जामीन मंजूर मिळवून दिला. या गंभीर प्रकरणाकडे जिल्हयातील जनतेचे लक्ष लागले होते. त्यामुळे अँड. तेजस नेहरकर यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.(sandalwood smuggling case)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/