सूर्य क्षत्रिय  ज्ञातिवर्धक मंडळ गिराळे , आयोजित शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रम...

पालघर तालुक्यातील गिराळे - नागवे ग्रामपंचायत कार्यालयात मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत विध्यार्थी शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. सदर कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य ( पालघर )  तुषार पाटील हे कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून उपस्थित राहिले. त्यानी मुलांना अतिशय मोजक्या शब्दात मार्गदर्शन केले.आणि आपली आई स्व  नलिनी नाशिक पाटील यांच्या स्मरणार्थ  दहा हजार रुपये रोख रक्कम शिष्यवृत्तीसाठी मदत निधी दिली.

सूर्य क्षत्रिय  ज्ञातिवर्धक मंडळ गिराळे , आयोजित शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रम...
Surya Kshatriya Jnativardhak Mandal Girale, Scholarship Distribution Program ...
सूर्य क्षत्रिय  ज्ञातिवर्धक मंडळ गिराळे , आयोजित शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रम...
सूर्य क्षत्रिय  ज्ञातिवर्धक मंडळ गिराळे , आयोजित शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रम...
सूर्य क्षत्रिय  ज्ञातिवर्धक मंडळ गिराळे , आयोजित शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रम...
सूर्य क्षत्रिय  ज्ञातिवर्धक मंडळ गिराळे , आयोजित शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रम...

सूर्य क्षत्रिय  ज्ञातिवर्धक मंडळ गिराळे , आयोजित शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रम...

पालघर तालुक्यातील गिराळे - नागवे ग्रामपंचायत कार्यालयात मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत विध्यार्थी शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

सदर कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य ( पालघर )  तुषार पाटील हे कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून उपस्थित राहिले . त्यानी मुलांना अतिशय मोजक्या शब्दात मार्गदर्शन केले.आणि आपली आई स्व  नलिनी नाशिक पाटील यांच्या स्मरणार्थ  दहा हजार रुपये रोख रक्कम शिष्यवृत्तीसाठी मदत निधी दिली.

त्यानंतर मंडळाचे सल्लागार आणि माजी अध्यक्ष  अशोक  ठाकूर यांनी प्रास्ताविक केले  व ओबीसी आरक्षण विषयी सतर्क रहावे या विषयी मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले.  मंडळाचे जेष्ठ कार्यकर्ते आणि माजी गटाध्यक्ष माणिक पाटील यांनीही मुलांना समाज्याच्या प्रत्येक कार्यक्रमास उत्साहपूर्वक उपस्थिती लावावी असे आवाहन केेले.

तसेच मंडळाचे माजी उपाध्यक्ष जगदीश पाटील यांनी ऑनलाइन नेटवर्किंगच्या युगात स्मार्टफोनचा सुयोग्य वापर करून स्मार्ट व्हा असा सल्ला दिला.

सदर कार्यक्रमास  नावझे गटातील कार्यकर्त्यांनी व मान्यवारांनीआणि ग्रामस्तानी हजेरी लावली. गिराळे नागवे गावचे सरपंच  बाबर , उपसरपंच  सुनील पाटील. मंडळाचे दिवाकर पाटील , हरेश्वर  पाटील ,धनंजय पाटील, आणि गावातील अनेक कार्यकर्त्यांनी उपस्थीती लावली.सदर कार्यक्रमासाठी  दिवाकर पाटील यांनी खूप मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

सदर कार्यक्रमाचं सूत्र संचलन आणि आभार प्रदर्शन मंडळाचे नावझे गट अध्यक्ष  अनंत  पाटील यांनी केले व विध्यार्थ्यांना भावी आयुष्यात निव्वळ ओबीसी आरक्षण अवलंबून न राहता स्पर्धात्मक अभ्यास करून सर्वांगीण विकास कसा साधता येईल असा सल्ला दिला. दिवाकर पाटील यांनी शिष्यवृत्ती विध्यार्थीचे वाचन करून मान्यवरांच्या हस्ते शिष्यवृत्ती वितरण केली. उपसरपंच सुनील पाटील यांनी आपल्या ग्रामपंचायत सभागृह प्राप्त करून दिले. शिवाय सम्पूर्ण कार्यक्रमास उपस्तीतांस नाष्टा आणि चहापाण्याची उत्कृष्ट सोय करून कार्यक्रमाची सांगता केली.

पालघर

प्रतिनिधी - रविंद्र घरत सफाळे

___________