करुणा शर्मा यांच्या समर्थनार्थ माजी सैनिक प्रकाश वाघमारे यांचे उपोषण चालुच

करुणा शर्मा - मुंडे यांच्या समर्थनार्थ भारत ज्योती पुरस्कार प्राप्त माजी सैनिक प्रकाश वाघमारे यांनी बुधवारी (ता. १५) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे.

करुणा शर्मा यांच्या समर्थनार्थ माजी सैनिक प्रकाश वाघमारे यांचे उपोषण  चालुच
soldier Prakash Waghmare

करुणा शर्मा यांच्या समर्थनार्थ माजी सैनिक प्रकाश वाघमारे यांचे उपोषण  चालुच

करुणा शर्मा - मुंडे यांच्या समर्थनार्थ भारत ज्योती पुरस्कार प्राप्त माजी सैनिक प्रकाश वाघमारे यांनी बुधवारी (ता. १५) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे.

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

बीड / दि. १६  करुणा शर्मा - मुंडे यांच्या समर्थनार्थ भारत ज्योती पुरस्कार प्राप्त माजी सैनिक प्रकाश वाघमारे यांनी बुधवारी (ता. १५) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे. त्यांची सार्वजनिक व प्रशासनिक अत्याचारातून मुक्तता करावी, अशी मागणी त्यांनी निवेदनात केली आहे.(soldier Prakash Waghmare)

राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेण्यासाठी परळीला आलेल्या करुणा शर्मा - मुंडे यांच्या विरोधात रविवारी (ता. ५) प्राणघातक हल्ला व अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा नोंद झाला. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली असून सध्या त्या बीडच्या जिल्हा कारागृहात आहेत. त्यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी (ता. १४) होणारी सुनावणीही पुढे ढकलली आहे.

 दरम्यान, आता त्यांच्या समर्थनार्थ प्रकाश वाघमारे यांनी निवेदन दिले आहे. करुणा शर्मा - मुंडे एक वर्षापासून आपल्या हक्क - अधिकारासाठी लढत असताना त्यांनाच खोट्या केसमध्ये गोवले जात आहे असा आरोप करून शासनाने ताकीदवजा पत्र काढावे. देशसेवा व समाजसेवेचे वृत्त अंगीकारून पत्र लिहीत असल्याचेही श्री. वाघमारे यांनी आपल्या निवेदनात उल्लेख केला आहे. शर्मा यांना अनेक विसंगत प्रकरणांत नीतिमूल्य बाजूला ठेवून गुन्हेगारी प्रकरणांत अडकविले जात आहे.

खोट्या केस करणाऱ्यांवर आणि संविधान संहिता घटनेने दिलेल्या अधिकारांचे उल्लंघन करून प्रशासनातील काही जबाबदार अधिकारी व कर्मचारी व्यभिचार करत असतील तर त्यांच्यावरही कारवाईची मागणी प्रकाश वाघमारे यांनी केली आहे.(soldier Prakash Waghmare)