पालघर पश्चिम किनारपट्टीवरील ५६ गावांमध्ये वाढवण बंदरा विरोधात कडकडीत बंद...

केंद्र सरकारच्या प्रस्तावित वाढवण बंदर विरोधात वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती व इतर सामाजिक संघटनानी मंगळवारी मुंबई कप परेडपासून झाईपर्यंत कोळीवाडे बंदची हाक दिली होती. या बंदला शुक्रवारी पश्चिम किनारपट्टीवरील सर्वच गावांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिल्याचे पहावयास मिळाले.

पालघर पश्चिम किनारपट्टीवरील ५६ गावांमध्ये वाढवण बंदरा विरोधात कडकडीत बंद...
Strict closure against Wadhwan port in 56 villages on Palghar west coast ...
पालघर पश्चिम किनारपट्टीवरील ५६ गावांमध्ये वाढवण बंदरा विरोधात कडकडीत बंद...
पालघर पश्चिम किनारपट्टीवरील ५६ गावांमध्ये वाढवण बंदरा विरोधात कडकडीत बंद...
पालघर पश्चिम किनारपट्टीवरील ५६ गावांमध्ये वाढवण बंदरा विरोधात कडकडीत बंद...

पालघर पश्चिम किनारपट्टीवरील ५६ गावांमध्ये वाढवण बंदरा विरोधात कडकडीत बंद...

केंद्र सरकारच्या प्रस्तावित वाढवण बंदर विरोधात वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती व इतर सामाजिक संघटनानी मंगळवारी मुंबई कप परेडपासून झाईपर्यंत कोळीवाडे बंदची हाक दिली होती. या बंदला शुक्रवारी पश्चिम किनारपट्टीवरील सर्वच गावांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिल्याचे पहावयास मिळाले. यामध्ये पालघर तालुक्यातील सातपाटी, वडराई, केळवे, दतीवरे व मुरबे या गावांमध्ये पूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात येऊन बोटी ही बंद ठेवण्यात आल्या होत्या. या वाढवण बंदर विरोधात किनारपट्टीवरील जवळपास ५६ गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी मच्छीमार्केट व भाजीमार्केट यांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला असून देशपातळीवरील मच्छिमार संघटना, पालघर मधील स्थानिक संघटना तसच रिक्षाचालक व मालक संघटनांनी देखील सहभाग घेतला. 

तर स्थानिकांनी एकत्र येत जवळपास पाच किलोमीटर लांबीची मानवी साखळी तयार केली होती. सरकारचा निषेध म्हणून काही स्थानिकांनी मुंडन ही केले. वाढवण बंदर उभारल्यास याचा मोठा फटका मच्छिमारांना तर बसणार आहेच मात्र पर्यावरणाचाही र्‍हास होणार असल्याची भीती स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत असून हे बंदर रद्द करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.

हा कडकडीत बंद पाळून शासनाचे लक्ष वेधण्याचे काम केले असून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात केंद्र सरकारच्या वाढवण बंदराविरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले, विक्रमगडचे आमदार सुनील भुसारा आणि बोईसरचे आमदार राजेश पाटील यांनी भेट दिली असता 'एकच जिद्द, वाढवण बंदर रद्द' असे बॅनर झळकवत निषेध व्यक्त केला आहे. 

याबाबत पालघरमधील या आदिवासी आमदारांचा आवाज विधिमंडळामध्ये घुमल्याने वाढवणबंदराचा विरोध आता अधिक तीव्र झाल्याचे दिसून आले आहे. आमदारांच्या या भूमिकेचे वाढवण बंदरविरोधी संघर्ष समितीनेही स्वागत केले आहे. बंदरासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा स्थापन केलेल्या कंपनीमार्फत विकसित केल्या जातील. त्यात समुद्रात भराव टाकून जमीन तयार करणे.

बॅकवॉटरसाठी बांधकाम करणे. या कामांचा समावेश आहे. स्थानिक मच्छीमार वर्ग देशोधडीला लागणार आहे . याविरोधात १५ डिसेंबरला मुंबई कप परेडपासून डहाणूच्या झाईपर्यंतच्या कोळीवाड्यांनी बंदची हाक दिली होती. या बंदला चांगला प्रतिसाद किनारपट्टीवरील सर्व गावांमध्ये पहावयास मिळाला. असून याविरोधात कडकडीत बंद पाळण्यात आला.

पालघर

प्रतिनिधी - राजेंद्र पाटील

___________