शील-सदाचाराने वागून डॉ. बाबासाहेबांचा आदर्श समोर ठेवावा - डॉ. इंदवंस्स महाथेरो

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक हाल-अपेष्टा सहन करून उच्च शिक्षण मिळविले. त्या संपूर्ण शिक्षणाचा व ज्ञानाचा उपयोग हजारो वर्षापासून शिक्षणापासून वंचित राहिलेल्या समाजाकरीता व देशहिताकरीता केला.

शील-सदाचाराने वागून डॉ. बाबासाहेबांचा आदर्श समोर ठेवावा - डॉ. इंदवंस्स महाथेरो
student day

शील-सदाचाराने वागून डॉ. बाबासाहेबांचा आदर्श समोर ठेवावा - डॉ. इंदवंस्स महाथेरो

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक हाल-अपेष्टा सहन करून उच्च शिक्षण मिळविले. त्या संपूर्ण शिक्षणाचा व ज्ञानाचा उपयोग हजारो वर्षापासून शिक्षणापासून वंचित राहिलेल्या समाजाकरीता व देशहिताकरीता केला.

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

 डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक हाल-अपेष्टा सहन करून उच्च शिक्षण मिळविले. त्या संपूर्ण शिक्षणाचा व ज्ञानाचा उपयोग हजारो वर्षापासून शिक्षणापासून वंचित राहिलेल्या समाजाकरीता व देशहिताकरीता केला. हा त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी व उपासकांनी निती व सदाचाराने वर्तन करुन सुजान नागरीक बनावे असे ‘यदी बाबा न होते’ या डॉ.आनंद कौशल्यायन यांच्या उद्गाराची आठवण काढून डॉ.भदन्त इंदवंस्स महाथेरो मुंबई यांनी संबोधित केले.(student day)


भिमराव रामजी आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन (विद्यार्थी दिन) ‘वाचाल तर वाचाल’ या फिरते मोफत वाचनालयातर्फे ‘सम्यक समबुध्द विहार’ नागोबा गल्ली बीड येथे आयोजित कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमास से.नि.अ.मु.का.अधिकारी पी.व्ही.बनसोडे तर प्रमुख पाहुणे म्हणून देवगीरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.प्रदीप रोडे व हेड पोस्टमास्टर बीडचे अमरसिंह ढाका लाभले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘वाचाल तर वाचालचे’ डी.जी.वानखेडे यांनी करुन वाचनालयाची कार्यपध्दती सांगितली व पालकांनी व विद्यार्थ्यांनी या वाचनालयाचा फायदा घ्यावा असे नम्र आवाहन केले.


सर्व प्रथम डॉ.भदन्त इंदवंस्स महाथेरो यांच्या हस्ते तथागतांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण केले. तर मान्यवरांच्या हस्ते महामानवांना पुष्पमाल व दीप, धुपाने पुजन करुन अभिवादन करण्यात आले. पुढे आपल्या देशनेत डॉ. इंदवंस्स म्हणाले की, ‘धम्म म्हणजे निती व निती म्हणजे धम्म’ अंधारातून प्रकाशाकडे जाण्याकरिता तथागताच्या अमुल्य उपदेशानुसार जीवनात आचरण करावे व तोच खरा दु:ख मुक्तीचा मार्ग आहे असे अनेक उदाहरणे देवून स्पष्ट केले. 7 नोव्हेंबर 1900 या दिवसाचे महत्व प्रा. प्रदीप रोडे यांनी इंग्रजीत परंतु अत्यंत प्रभावी व सोप्या भाषणात इंग्रजी भाषेच्या शिक्षणाचे महत्व विद्यार्थ्यांना समजावून दिले. व इंग्रजी ज्ञानाच्या जोरावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी विविध विषयावर मिळवलेल्या ज्ञान संपदेमुळे ते जगात ‘सिंबॉल ऑफ नॉलेज’ (प्रज्ञा सूर्य) म्हणून नावलौकिकास आले. आपली गरीबी शिक्षणाच्या आड येवू देवू नका, अपार कष्ट व प्रयत्नांची शिकस ठेवून गुरूजनांच्या मार्गदर्शनाखाली उच्च शिक्षण कसे घेता येईल हे ध्येय समोर ठेवावे असे बाबासाहेबांच्या व थोर महापुरूषांच्या जीवनातील अनेक उदाहरणे देवून स्षष्ट केले. तर उपासक अमरसिंह ढाका यांनी बालकांना लहानपणीच वाचनाची गोडी लागावी, शिस्तीचे व लहानपणीच्या संस्काराचे महत्व विषद केले.

व विहारे हे संस्कार केंद्र व्हावीत असे प्रतिपादन केले. अध्यक्षीय समारोप करतांना उपासक बनसोडे पी.व्ही. सर म्हणाले की, अंधश्रध्दा, अनिष्ट रूढी, परंपरेपासून विद्यार्थ्यांनी व उपासकांनी दूर रहावे. त्या करीता वैज्ञानिक दृष्टीकोन समोर ठेवावा व डॉ.बाबासाहेबांनी दिलेल्या तथागतांच्या धम्माचे अनुसरून करुन जीवनात सुख प्राप्त करावे.डॉ.इंदवंस्स महाथेरो व मान्यवरांच्या हस्ते दहा ज्येष्ठ महिलांचा राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महाराणी आहिल्याबाई होळकर, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य ज्योतीबा फुले, माता रमाई, माता भिमाई, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्राची पुस्तके व गुलाबपुष्प देवून सत्कार करण्यात आला. तसेच विहार परिसरातील विद्यार्थ्यांकरीता 75 पुस्तकांचा संच वितरित करण्यात आला. पुस्तक वितरणाची जबाबदारी उपा.आदर्श जोगदंड यांनी स्वयंस्फुर्तपणे स्विकारली. शाळा प्रवेश दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना ‘वाचाल तर वाचाल’ तर्फे पेन, वह्या, शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमास उपा. राजु जोगदंड, कॅप्टन राजाभाऊ आठवले, अशोक गायकवाड, शांताराम जोगदंड, गौतम सोनवणे, वैजिनाथ पायके, दळवी बी.जी., प्रकाश खंडारे, राम वडमारे, विनोद जोगदंड, बळीराम जोगदंड, भगवान जोगदंड, उपासिका रेखा जोगदंड, सोजरबाई जोगदंड, जलसाबाई इनकर, मालनबाई जोगदंड, इंदुबाई जोगदंड, कमलबाई जोगदंड, रमाबाई जोगदंड, पार्वतीबाई जोगदंड व परिसरातील बहुसंख्य विद्यार्थी, उपासक, उपासिकांची उपस्थिती होती. बबीता इनकर, निशा कांबळे, रिंकु जोगदंड व आदर्श जोगदंड यांनी कार्यक्रम यशस्वीतेकरीता बहुमोल परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन तसेच विद्यार्थ्यांना फळाचे वाटप महामानव सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष उपा.गुलाब भोले यांनी केले. सरणात्तयने कार्यक्रमाची सांगता झाली.(student day)