घातक “सकर” माशाची भर, मच्छीमारही हैराण

"सकर" या माशामुळे नवीन संकट उजनी धरणावर घोंगावत आहे.

घातक “सकर” माशाची भर, मच्छीमारही हैराण
sucker fish

घातक “सकर” माशाची भर, मच्छीमारही हैराण

"सकर" या माशामुळे नवीन संकट उजनी धरणावर घोंगावत आहे.

पर्यावरणाला धोका पोहोचवणारा तसेच हरित लवादाने बंदी घातलेला मांगूर मासा नष्ट करण्यासाठी राज्य शासन मोहिमा हाती घेत आहे. आता अजून एका उपद्रवी आणि विद्रूप अशा “सकर” या माशामुळे नवीन संकट उजनी धरणावर घोंगावत आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाचा मत्स्यव्यवसाय विभाग आणि मच्छीमार मोठ्या चिंतेत सापडलेत.उजनी धरणातील मांगूर मासा कसा नष्ट करायचा या चिंतेत असताना आता सकर या माशामुळे नवीन संकट आलेय.(Deadly "sucker" fish, harassing fishermen)


मुळात तर या माशाची ओळख फिश टॅंकमधील शोभिवंत मासा म्हणून होती. मात्र फिश टॅंकमध्ये अनेक शोभिवंत माशांनी प्रवेश केल्यानंतर व पाळणाऱ्यांची हौस फिटल्यानंतर हा मासा खाडीत, नदीत सोडून देण्यास सुरुवात झाली. हा मासा मूळचा अमेरिकेतला असल्याचे अभ्यासक सांगतात. आता मुंबई खाडीत आणि वाराणसीच्या गंगा नदीत हा मासा आढळून आला होता, तेव्हापासूनच मत्स्य अभ्यासकांनी धोक्याची सूचना दिली होती. मात्र या धोकादायक माशाने आता राज्यातील सर्वात मोठे उजनी पाणलोट क्षेत्र व्यापून टाकले आहे.


विशेष म्हणजे हा मासा मांसाहारी असल्याने तो इतर माशांना व त्यांची अंडी खाण्यात तरबेज असतो. हा मासा टणक असल्याने इतर माशांपासून हा सकर मासा सुरक्षित राहतो. साहजिकच त्याची संख्यावाढ जलदगतीने होते. असा हा सकर मासा उजनीत थोड्या संख्येने नव्हे, तर मोठ्या संख्येने आढळून येऊ लागला आहे. मच्छीमारांच्या जाळ्यात हा मासा अडकल्यानंतर तो सहजासहजी जाळ्यातून निघत नाही, त्यास काटे खूप असतात, त्यासाठी जाळी फाडवी लागत आहेत. 


उजनी धरणात हजारो मच्छीमार रोज मासेमारी करत असतात, इंदापूर शहरात आणि इंदापूर तालुक्यातील भिगवण या भागात राज्यातील प्रसिद्ध असे मासळी बाजार पेठ आहे, उजनी धरणात मासेमारी करत असताना मच्छीमारांच्या जाळ्यात रोज शेकडो किलो हा मांगूर मासा तर सापडतोच पण आता त्याबरोबर सकर हाही मासा सापडू लागल्यानं मच्छीमार तसेच अडते व्यापारीही अडचणीत येत आहेत. सकरसारखे धोकादायक आणि घातक माशे उजनी धरणात मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत.(Deadly "sucker" fish, harassing fishermen)

मत्स्य विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी, मंत्र्यांनी यावरती तात्काळ बैठक घेऊन उजनीतील मांगूर आणि सकर मासा कसा नष्ट करायचा यावरती उपाययोजना करणे गरजेचे आहे.