पुण्यातलं 10 दिवसांचं लॉकडाऊन संपलं, मात्र या अटी-नियम लागू राहणार.....

पुण्यात कोरोना व्हायरसचे प्रसार वाढत असल्यानं १०दिवसांचा (१३ जुलै ते २३ जुलै) लॉकडाऊन जारी करण्यात आला होता. २३ जुलैला हा लॉकडाऊन संपत असल्यानं पुणे महापालिका प्रशासनानं नवीन नियम जारी केले आहेत.

पुण्यातलं 10 दिवसांचं लॉकडाऊन संपलं, मात्र या अटी-नियम लागू राहणार.....

पुण्यातलं 10 दिवसांचं लॉकडाऊन संपलं, मात्र या अटी-नियम लागू राहणार.....

पुण्यात कोरोना व्हायरसचे प्रसार वाढत असल्यानं १०दिवसांचा (१३ जुलै ते २३ जुलै) लॉकडाऊन जारी करण्यात आला होता. २३ जुलैला हा लॉकडाऊन संपत असल्यानं पुणे महापालिका प्रशासनानं नवीन नियम जारी केले आहेत.

नव्या नियमांमधील महत्त्वाचे मुद्दे -

केंद्र सरकारचे कोरोनाच्या नियंत्रणासाठी केलेले आदेश लागू राहतील
महापालिका हद्दीत कोणत्याही व्यक्तीला अत्यावश्यक कारण किंवा सेवा वगळता रात्री 9 ते सकाळी 5 वाजेपर्यंत घराबाहेर जाता येणार नाही.
65 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या, आजारी व्यक्ती, गरोदर महिला, 10 वर्षांपेक्षा कमी वय असलेली मुलं यांना अत्यावश्यक सेवा आणि आरोग्यविषयक अडचणींशिवाय घराबाहेर जाता येणार नाही.
हे तिन्ही नियम सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रासाठी  यांसाठी लागू राहतील.

पुणे महापालिकेनं प्रतिबंधित क्षेत्रासाठी (Containment Zone) स्वंतंत्र नियमावली जाहीर केलीय. त्यानुसार,

प्रतिबंधित क्षेत्रात वैद्यकीय सेवा, आपत्कालीन सेवा आणि जीवनावश्यक वस्तूंच्या सेवा सुरू राहतील. इतर व्यक्तींना या क्षेत्रात प्रवेशास बंदी.
दूध आणि भाजीपाला किंवा स्वयंपाकाचा गॅस इत्यादी इतर अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे, औषध विक्रेते, अत्यावश्यक सेवा पुरवणारे कार्यालयं, कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्ती आणि त्यांच्या वाहनांना या प्रतिबंधित क्षेत्रात बंदी नसेल.
महापालिकेकडून अत्यावश्यक सेवा देणाऱ्या सर्वांना या क्षेत्रात प्रवेश मिळेल. त्यांना कोणत्याही पासची आवश्यकता नाही.
प्रतिबंधित क्षेत्रात अत्यावश्यक वस्तूंची (किराणा दुकान, भाजीपाला विक्री, औषध विक्री, दवाखाने, दूध विक्री, रेशन दुकाने इत्यादी) दुकाने सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत उघडी राहतील.

वाहनांचा कसा वापर करता येईल?
नागरिकांच्या अत्यावश्यक सोयीसाठी पुणे महापालिकेनं काही नियम आखून दिले आहेत.

टॅक्सी किंवा कॅब - वाहनचालक + 2 व्यक्ती
रिक्षा - वाहनचालक + 2 व्यक्ती
चारचाकी वाहन - वाहनचालक + 2 व्यक्ती
दुचाकी वाहन - केवळ वाहन चालवणारी व्यक्ती
प्रतिबंधित क्षेत्राबाहेर दुकानं उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, त्यासाठी काही नियम-अटी लागू करण्यात आलेत. सकाळी 9 ते संध्याकाळी 7 या वेळेतच दुकानं उघडण्यास परवानगी देण्यात आलीय. दुकानातील कर्मचारी प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेरील असावा, अशी अट आहे. आरोग्याच्या दृष्टीनं घ्यायच्या सर्व खबरदारी घेणे बंधनकारक आहे.

खासगी कार्यालयांमध्ये 10 टक्के कर्मचारी किंवा जास्तीत जास्त 10 कर्मचारी कामावर येऊ शकतात. उर्वरीत कर्मचाऱ्यांनी घरूनच काम करावे, असं महापालिकेचं म्हणणं आहे.

प्रतिबंधित क्षेत्रात खालील गोष्टी पूर्णपणे बंद राहतील -

शाळा, महाविद्यालय, प्रशिक्षण वर्ग, विद्यार्थ्यांच्या शिकवण्या इत्यादी.
सिनेमा हॉल, व्यायामशाळा, पोहण्याचे तलाव, करमणुकीची ठिकाणे, नाट्यगृहे
सामाजिक, राजकीय, क्रीड, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम आणि कोणत्याही कारणाने होणारी मोठी गर्दी
सर्वसामान्य व्यक्तींसाठी असलेली धार्मिक स्थळं
मॉल, हॉटेल उपहारगृहे आणि इतर आदरातिथ्य करणाऱ्या सेवा.