NASA चा अलर्ट! अंतराळातून पृथ्वीच्या दिशेनं आणखी एक मोठं संकट...

जगातील अनेक देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. एकीकडे कोरोना व्हायरसच्या संकटामुळे जगासमोर आव्हान उभं केलं असताना दुसरीकडे अवकाशातून आणखी नवं संकट पृथ्वीच्या दिशेने येत असल्याची माहिती समोर आली आहे.

NASA चा अलर्ट! अंतराळातून पृथ्वीच्या दिशेनं आणखी एक मोठं संकट...

NASA चा अलर्ट! अंतराळातून पृथ्वीच्या दिशेनं आणखी एक मोठं संकट...

न्यूयॉर्क, २४जुलै : जगभरात कोरोना व्हायरसने विळखा घातला आहे. जगातील अनेक देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. एकीकडे कोरोना व्हायरसच्या संकटामुळे जगासमोर आव्हान उभं केलं असताना दुसरीकडे अवकाशातून आणखी नवं संकट पृथ्वीच्या दिशेने येत असल्याची माहिती  नासानं दिला आहे. पृथ्वीजवळून शुक्रवारी १७० मीटर मोठी उल्का (Asteroid 2020 ND) पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार असल्याचा इशारा नासाकडून देण्यात आला आहे.

Asteroid 2020 ND असं या उल्केचं नाव आहे. ही उल्का .०३४एस्ट्रोनॉमिकल यूनिट म्हणजे साधारण ५० लाख ८६ हजार ३२८ किलोमीटर अंतरावरून ही उल्का जाणार आहे. या उल्केचा वेग तासाला साधारण ४८ हजार किलोमीटर असणार आहे. याआधी ५ जून रोजी पृथ्वीवरून उल्का गेली होती. पृथ्वीपासून १ लाख ९० हजार मैल. उल्का 2020 एलडी पृथ्वी आणि चंद्रामधून गेला. त्याचा आकार ४०० फूट होता. शास्त्रज्ञांना याबद्दल ७ जूनपर्यंत काहीच नव्हते.

प्लॅनेटरी सोसायटीच्या म्हणण्यानुसार तीन फूट सुमारे १ अब्ज ऐस्टेरॉयड आहेत. ९० फुटापेक्षा जास्त मोठ्या आकाराच्या उल्कांचा धोका अधिक असतो. दरवर्षी साधारण ३० छोटे उल्कापात होत असतात पण त्यातून कोणतंही नुकसान झालं नाही. दुसरी उल्का म्हणजे 2016 DY 30. ही उल्का पृथ्वीपासून सुमारे ३४ लाख किमी अंतरावरून येत आहे. तर 2020 ME3 पृथ्वीपासून ५६ लाख किलोमीटर अंतरावरून येणार आहे. हे सर्व उल्का पृथ्वीजवळून जाणार असल्यानं नासाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे.