मुंबाईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या मोठ्या भावाचा कोरोनामुळे मृत्यू....| BMC Mayor Kishori Pednekar's brother dies due to COVID-19 | today's news in marathi
today's news in marathi : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या मोठ्या भावाचे आज करोनामुळे निधन झाले. सुनील कदम असे त्यांचे नाव होते.

today's news in marathi :
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या मोठ्या भावाचा कोरोनामुळे मृत्यू....
महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनचे थोरले बंधू सुनिल कदम यांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या 7 दिवसांपासून सुनिल कदम यांच्यावर महापालिकेच्या नायर हाँस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र, शनिवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या आठवणीत महापौर किशोरी पेडणेकर यांनी एक कविताही पोस्ट केली आहे.
दरम्यान, गेल्या एप्रिल महिन्यात महापौर किशोरी पेडणेकर या देखील होम क्वारंटाइन झाल्या होत्या. BMC च्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती.
त्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्वत:ला होम क्वारंटाईन केलं होतं. महापौर किशोरी पेडणेकर या 14 दिवस घरीच होत्या. महापौर किशोरी पेडणेकर काही पत्रकारांच्या संपर्कात आल्या होत्या.