भुयारी गटार योजनेच्या नावाखाली फोडलेले रस्त्याच्या ठिकाणी त्वरित नवीन रस्ते करा करा....

गेल्या 2 वर्षा पासून 100 कोटी रुपये बजेट असलेल्या भुयारी गटार योजनेच्या नावाखाली शहरातील बहुतांश रस्ते फोडून त्यात गटाराचे पाईप टाकले मात्र फोडलेले रस्त्यावर अद्याप नवीन रस्ते निर्माण न केल्या मुळे शहरातील नागरिक हवालदिल झाले आहेत.

भुयारी गटार योजनेच्या नावाखाली फोडलेले रस्त्याच्या ठिकाणी त्वरित नवीन रस्ते करा करा....
underground sewerage scheme

भुयारी गटार योजनेच्या नावाखाली फोडलेले रस्त्याच्या ठिकाणी त्वरित नवीन रस्ते करा करा

गेल्या 2 वर्षा पासून 100 कोटी रुपये बजेट असलेल्या भुयारी गटार योजनेच्या नावाखाली शहरातील बहुतांश रस्ते फोडून त्यात गटाराचे पाईप टाकले मात्र फोडलेले रस्त्यावर अद्याप नवीन रस्ते निर्माण न केल्या मुळे शहरातील नागरिक हवालदिल झाले आहेत.

परळी ..गेल्या 2 वर्षा पासून 100 कोटी रुपये बजेट असलेल्या भुयारी गटार योजनेच्या नावाखाली शहरातील बहुतांश रस्ते फोडून त्यात गटाराचे पाईप टाकले मात्र फोडलेले रस्त्यावर अद्याप नवीन रस्ते निर्माण न केल्या मुळे शहरातील नागरिक हवालदिल झाले आहेत तरी येणाऱ्या पाच दिवसांच्या आत या फोडलेल्या रस्त्यांचे काम चालू नाही झाले तर येत्या सोमवारी 30 ऑगस्ट रोजी नगरपरिषद कार्यालया समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा भाजपाचे नगरसेवक प्रा पवन मुंडे यांनी दिला आहे.


   गेल्या दोन 2 वर्षा पासून शहरातील गल्लोगल्ली तील लहान- मोठे , अनेक चांगले व काही नवीन झालेले रस्ते खोदून "भुयारी गटार योजनेच्या" नावाखाली फोडले मात्र त्या नंतर त्या ठिकाणी नवीन रस्ते करणे हे टेंडरच्या अंदाजपत्रका मध्ये असतांना त्या कडे ना कंत्राटदार लक्ष देत आहे ना नगरपालिका प्रशासन देत आहे,सध्या पावसाळ्या चे दिवस असल्याने पावसा मुळे सर्व खोदलेल्या रस्त्यावर चिखल झाल्याने रहदारीच्या अडचणी मुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत व  बेहाल झाले आहे.

100 कोटींचे काम घेणारा संबंधित कंत्राटदार हा फोडलेल्या रस्त्यावर करावयाच्या रस्त्याच्या बजेट चे पैसे नगरपालिका प्रशासनाच्या आशीर्वादाने फक्त "कागदोपत्री रस्ते केले" असे दाखवून उचलून घेण्याच्या मनस्थितीत आहे का ? असा प्रश्न प्रा पवन मुंडे यांनी उपस्थित केला असून येत्या पाच दिवसात शहरांतील फोडलेल्या रस्त्यांच्या ठिकाणी नवीन रस्ते करण्याचे काम चालू नाही केले तर दिनांक 30 ऑगस्ट सोमवार रोजी नगरपालिका कार्यालया समोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचे नगरसेवक  प्रा पवन मुंडे यांनी म्हटले आहे.

बीड जिल्हा प्रतिनिधी
विश्वनाथ शरणांगत