वर्क फ्रॉम होम आणखी उत्साहवर्धक करायचंय?

उन्‍हाळा ऋतू आला आहे आणि उकाडा देखील वाढत आहे. वर्क फ्रॉम होम दीर्घकाळापर्यंत राहण्‍याची शक्‍यता आहे आणि त्‍यामध्‍ये उन्‍हाळ्याची भर पडत आहे.

वर्क फ्रॉम होम आणखी उत्साहवर्धक करायचंय?
work from home

वर्क फ्रॉम होम आणखी उत्साहवर्धक करायचंय?

Want to make work from home even more exciting

उन्‍हाळा ऋतू आला आहे आणि उकाडा देखील वाढत आहे. वर्क फ्रॉम होम दीर्घकाळापर्यंत राहण्‍याची शक्‍यता आहे आणि त्‍यामध्‍ये उन्‍हाळ्याची भर पडत आहे. 

 ज्‍यामुळे काम करण्‍यासाठी आसपासचे वातावरण उत्‍साहवर्धक असणे आवश्‍यक आहे. घरातील बेडरूम्‍स व लिव्हिंग रूम्‍सना आता कार्यालयांचे रूप मिळाले असताना तुम्‍हाला कामकाजाच्‍या व्‍यस्‍त दिवसामध्‍ये योग्‍य संतुलन राखण्‍यास मदत करणारी जागा निश्चित करणे महत्त्वाचे आहे.

तुम्‍ही गेल्‍या वर्षीपासून वर्क फ्रॉम होम करत आहात, ज्‍यामुळे कामासाठी स्‍वतंत्र जागा नसल्‍यास कामामध्‍ये मन लागत नाही. उत्तमरित्‍या रचना असलेले फर्निचर, स्‍नॅक्‍स व पेय ठेवण्‍यासाठी पुरेशी जागा, गोपनीयता, सकारात्‍मक ऊर्जा आणि उत्तम प्रकाशयोजना असलेले कार्यस्‍थळ असणे अत्‍यंत महत्त्वाचे आहे. 

बहुतांश भारतीय घरे ‘होम ऑफिस’मध्‍ये बदलता येईल अशा रूपात डिझाईन करण्‍यात आलेली नाहीत. म्‍हणून घरामध्‍ये सुलभपणे सामावून जाऊ शकेल असे फर्निचर असणे महत्त्वाचे आहे, जे बहुउद्देशीय देखील असेल. तुम्‍हाला थोडीशी मोकळी जागा सोडून बेडरूममध्‍ये काम करायला आवडत असेल, तर बे वर्क डेस्‍कची शिफारस करता येईल. 

आपण घरामध्‍येच बंदिस्‍त झालो आहोत आणि आपल्‍या बैठेकाम करण्‍याच्‍या शैलीमध्‍ये वाढ झाली आहे. ज्‍यामुळे आपली आसनव्‍यवस्‍था आकर्षक असण्‍यासोबत आल्‍हाददायी असणे आवश्‍यक आहे. डेस्‍कसमोर खुर्चीवर बसून काम करण्‍याच्‍या पद्धतीला काहीसा विरंगुळा द्या आणि लाऊंज खुर्चीवर काम करण्‍याचा उत्‍साहवर्धक अनुभव घ्‍या. आम्‍ही वर्क डेस्‍क असलेल्‍या फ्लाइट चेसची शिफारस करतो, जे लिव्हिंग रूममध्‍ये सुलभपणे सामावून जाऊ शकते.

महामारीदरम्‍यान लिव्हिंग रूम्‍सना होम ऑफिसचे रूप मिळाले आहे. वर्क फ्रॉम होम पुढे सुरूच राहण्‍याची शक्‍यता असल्‍यामुळे तुम्‍हाला काम करताना आरामदायी सुविधा देण्‍यासोबत किफायतशीर असलेल्‍या फर्निचरची गरज आहे. आम्‍ही ‘बॉबीन रेंज ऑफ सोफाज’ची शिफारस करतो, जे लिव्हिंग रूम अधिक आकर्षक करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहे आणि तुम्‍ही आरामशीरपणे काम करण्‍यासोबत कुटुंबासोबत एकत्रित उत्तम क्षणांचा आनंद घेण्‍याची खात्री देते.

या त्रस्त करणाऱ्या उकाड्यामध्‍ये उत्तमरित्‍या हायड्रेटेड राहणे आवश्‍यक आहे आणि थंडगार पेयांव्‍यतिरिक्‍त या उकाड्यामध्‍ये आपल्‍याला उत्तमरित्‍या दिलासा देणारी दुसरी कोणतीच गोष्‍ट नाही. पण, क्‍लायण्‍टसोबत मीटिंग सुरू असताना मध्‍येच थंडगार पाणी पिण्‍याची सुविधा कोण देऊ शकतो? आम्‍ही क्‍यूबची शिफारस करतो. हे तुम्‍हाला थंडावा देणारे कॉम्‍पॅक्‍ट पर्सनल कूलिंग सोल्‍यूशन आहे, जे पाणी, सरबत व लस्‍सीला थंड ठेवते. यामध्‍ये फ्रॉस्‍ट नसून ते 100 टक्‍के पर्यावरण अनुकूल आहे आणि याचा मेन्‍टेनन्‍स देखील कमी आहे.

महामारीदरम्‍यान ईकॉमर्स डिलिव्‍हरीजमध्‍ये वाढ झाली आहे, ज्‍यामुळे डिलिव्‍हरीजच्‍या पॅकेजिंगमधून विषाणूचा संसर्ग होण्‍याची चिंता देखील वाढली आहे. चिंता करण्‍यापेक्षा आम्‍ही प्रतिबंध या सर्वोत्तम उपायाला प्राधान्‍य देत यूव्‍ही केस डिसइंफेक्‍शन सिस्टिममध्‍ये गुंतवणूक करण्‍याची शिफारस करतो. हे यूव्‍ही-सी तंत्रज्ञानाचा वापर करते आणि लीक-प्रूफ व सीएसआयआर प्रमाणित आहे.

हे डिवाईस मिनिटांमध्‍ये व्‍यक्‍तींद्वारे दररोज वापरण्‍यात येणा-या प्रत्‍येक गोष्‍टीचे निर्जंतुकीकरण आणि सॅनिटाईज करू शकते