योगेश चव्हाण हे अतुलनीय भारतीय नायक सन्मानाने सन्मानित...

ज्यांनी सन 2020 मध्ये लोकांचे, स्वच्छ आणि हरित (सुजलाम सुफलाम) भविष्य निर्माण करण्यात मोलाचे योगदान दिले. Heros Of Sustainability 2020  हा सन्मान एकूण 10 भारतीयांना देण्यात येतो त्या दहामध्ये एक आहेत दहिगाव, गावचे सुपुत्र श्री योगेश किसन चव्हाण.

योगेश चव्हाण हे अतुलनीय भारतीय नायक सन्मानाने सन्मानित...
Yogesh Chavan is an incomparable Indian hero ...
योगेश चव्हाण हे अतुलनीय भारतीय नायक सन्मानाने सन्मानित...

योगेश चव्हाण हे अतुलनीय भारतीय नायक सन्मानाने सन्मानित...

ज्यांनी सन 2020 मध्ये लोकांचे, स्वच्छ आणि हरित (सुजलाम सुफलाम) भविष्य निर्माण करण्यात मोलाचे योगदान दिले. Heros Of Sustainability 2020  हा सन्मान एकूण 10 भारतीयांना देण्यात येतो त्या दहामध्ये एक आहेत दहिगाव, गावचे सुपुत्र श्री योगेश किसन चव्हाण.

श्री योगेश यांनी सन 2017 पासून CSR फंड उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि फंड उपलब्ध झाल्यानंतर दहिगावमधील स्थानिकांच्या सहकार्याने वसना नदीत मोठ्या प्रमाणावर जलसंवर्धन केले.

CSR निधी उपलब्ध करून N थांबता त्याचा सुयोग्य वापर आणि त्यासाठी महत्वपूर्ण अभ्यास त्यांनी केला. स्वतःच्या गवाबरोबरच परिसरातील गावांचे शिवार ओढ्यांमध्ये लहान मोठे बंधारे बांधून पाणी अडवले. त्यामुळे भूजल पातळीत वाढ होऊन परिसरातील हातपंपाना आणि विहिरींमध्ये पाणीसाठा वाढला, बळीराजा सुखावला, गावातील युवकांचे शहराकडे होणारे स्थलांतराचे प्रमाण कमी झाले. दुष्काळग्रस्त गाव टँकरमुक्त झाले. वैयक्तिक आयुष्यात कितीही संकटे आली आणि त्यावर मात करत त्यांनी सामाजिक कार्य निस्वार्थी चिरंतर सुरू ठेवले आहे.

श्री योगेश यांनी अवघ्या महाराष्ट्राला आणि देशाला दाखवून दिले की पाणी हे ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी महत्वाचा घटक आहे. त्यांचा आपल्या गावाबरोबरच सभोवतालची गावे समृद्ध सुजलाम सुफलाम करण्याच्या मानस त्यांनी बांधला आहे.

श्री योगेश सुचवतात की, कंपन्यांनी आपला CSR फंड शहरां व्यतिरिक्त ग्रामीण भागाकडे वळवून ग्रामीण विकासावर लक्ष केंद्रित करावे. अशा ग्रामीण विकास कार्यात आपल्या नावाची छाप उमटवणारे योगेश चव्हाण यांचे सर्वच स्थरातून अभिनंदन केले जात आहे.

सातारा

प्रतिनिधी - उमेश चव्हाण 

___________